रस्त्यासाठी महिलांनी उगारले आमरण उपोषणाचे हत्यार.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

        

तालुक्यातील वडकी येथील एका कुटुंबातील महिलांनी स्वताच्या घराचा रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी उपोषणाचे हत्यार उगारले असुन जोपर्यंत रस्ता मोकळा होणार नाही तोपर्यंत उपोषण मंडपातून उठणार नाही असा पवित्रा घेतला आहे.आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
वडकी येथील डांगे कुटुंबातील मिराबाई ज्ञानेश्वर डांगे व अन्नपूर्णाबाई तुळशीराम डांगे या दोन महिला २२ आक्टोंबर पासुन वडकी येथील ग्राम पंचायतीपुढे उपोषणाला बसल्या असुन वडिलोपार्जित सुरू असलेला रस्ता मोकळा करून द्यावा व रस्त्यावर असलेले अतिक्रमण तथा अवैध बांधकाम हटविण्यात यावे या मागणीसाठी सदर महिलांची मागणी आहे.तसेच येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधात १४ ड ची कारवाई करुन सचिवाला निलंबित करण्यात यावे अशी मागणी उपोषणकर्त्या महिलांनी केली आहे.दरम्यान २३ आक्टोंबर रोजी दुपारी गटविकास अधिकारी रविकांत पवार यांनी उपोषण मंडपाला भेट दिली होती.