
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
सावंगी (डाफ) ते सावरगाव रोड करिता मा. श्री.आमदार साहेब खासदार ताई यांचा कडे आम्ही सावंगी डाफ वासियनी वारंवार जाऊन डामरीकरण रोड ची मागणी केलेली होती परंतु कुठेच यश मियाले नाही. अखेर कलेक्टर साहेब नी वर्धा नदीच्या वाळू खनिज उतखननासाठी रोड मंजुरात करून दिला तो ४ कीलो मीटर पैकी फक्त ७००मीटर करून दिला.काय तर गावचे समाधान आज ही गावाला जाताना रोड ने न जाता केनल ने जाऊन गाव पहावे लागते. ग्रामीण भागातील परिस्थिती आज अशीच दिसून येत आहे. वारंवार इलेक्ट्रिक मीडिया , सोशल मीडिया, प्रेस मीडिया च्या माध्यमातून आम्ही गावकरी मंडळी महाराष्ट्र समोर गावाची परिस्थिती दाखवत होतो.आज गावातील रोड ची दिशा जसे आहे तसे फक्त काय तर ७०० मीटर रोड करून गावचे समाधान.आज सगळी कडे समृध्दी महामार्ग जोरात सुरू आहे तर ग्रामीण भागात पाय वाटेचा चा च महामार्ग सुरू आहे ही राळेगाव,कळंब मतदार संघाची शोकांतिका आहे.🙏
आपलाच गावकरी
दिपक डाफ
8888843015
