केंद्राने शेतकरी हितासाठी जिएम, एच टी बिटी तंत्रज्ञानाला परवानगी द्यावी. – अॅड वामनराव चटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

आज दिनांक 12 जूनला खडकी ( वडकी) ता. राळेगांव येथे शेतकरी संघटना यवतमाळ जिल्ह्याचे वतीने शेतक-यांना एच टी बीटी / जिएम तंत्रज्ञानाचे बियाणे वापरायची बंदी हटविण्यासाठी ” तंत्रज्ञान सत्याग्रह आंदोलन ” आयोजीत करण्यात येवून श्री राजू झोटींग यांचे शेतात शेतकरी संघटने नेते अॅड वामनराव चटप यांचे नेतृत्वात, स्वभापचे प्रदेशाध्यक्ष श्री मधुसूदन हरणे, शेतकरी युवा आघाडीचे माजी अध्यक्ष श्री सतिश दाणी, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री विजय निवल, देवरावजी धांदे याचे प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी शासना कडून प्रतीबंधीत एचटीबीटी कापूस बियांणाची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी बोलतानी अॅड वामनराव चटप यांनी देशातील इतर उद्योग, व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान वापरायला सरकार परवानगी देते, तर आधुनिक तंत्रज्ञानयुकत जिएम, एचटीबीटी तंत्रज्ञानाने तयार झालेले बियाणे देशातील शेतक-यांना वापरावर बंदी का घातली गेली? असा प्रश्नन उपस्थित करून जगातील इतर देशात या बियाणांचा वापर करून उत्पादन खर्च कमी आणी उत्पादन जास्त होत आहे. त्यांच्याशी भारतीय शेतक-यांना स्पर्धा करावी लागत आहे. तेव्हा शेती क्षेत्रात नविन तंत्रज्ञान युक्त बियाणे वर केंद्र सरकारने घातलेली बंदी तातडीने हटवावी, आणी शेतक-यांना तंत्रज्ञानाचे आणी बाजारपेठेचे स्वातंत्र बहाल करावे, अशी मागणी त्यांनी अध्यक्षीय भाषणात केली.
या प्रसंगी बोलताना स्वभापचे प्रदेशाध्यक्ष श्री मधुसूदन हरणे यांनी केंद्र सरकार विदेशातून जिएम तंत्रज्ञानाने तयार बियाणाचे सोयातेल, सरकी तेल, पामतेल, सोयापेंड आयात करुन देशातील बाजारातून विक्री करण्याची परवानगी दिली आहे, तर तेच जिएम बियाणे देशातील शेतक-यांना वापरावर बंदी का टाकली आहे? देशातील नागरिकांना “कोरोना प्रतिबंधित लस” हि जिएम तंत्रज्ञानाने केलेली आहे, त्या लसीनेच देशातील कोरोना संकटातून नागरिकांना सुरक्षा दिली, मग याच तंत्रज्ञानाने तयार झालेले बियाणे आरोग्यास अपायकारक कसे? हि सरकारची बनवेगीरी असून शेतक-यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र द्यावे, या मागणी साठी आज हे आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगीतले.
तर यावेळी बोलतानी श्री विजय निवल यांनी एचटीबीटी तंत्रज्ञानाने तयार बियाणे वापराने शेतक-यांचा मजूरी वरील खर्च कमी होवून शेतक-यांचे उत्पन्नात वाढ होते, हे मागील काही वर्षांपासून शेतकरी अनुभवत आहे, तरी केंद्र सरकारने घातलेली बंदी उठविणे काळाची गरज आहे, घातलेली बंदी तातडीने हटवावी यासाठीच हे आंदोलन होत असल्याचे सांगीतले.
या आंदोलनात गावातील आणी परिसरातील शेकडो महीला, पुरूष कार्यकरतांनी सहभागी होत प्रतीबंधीत एचटीबीटी कापूस बियांणाची लागवड केली.
या सभेत माती, पाणी परिक्षणा बाबत श्री मिलींद दामले, व रासायनिक खताचा वापरा बाबत श्री राजेंद्र गावडे यांनी माहीती दिली. या सभेचे प्रास्ताविक आंदोलनाचे आयोजक व शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख श्री राजेंद्र झोटींग यांनी तर आभार प्रदर्शन श्री अक्षय महाजन यांनी केले.
या आंदोलनात महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सोनाली मरघडे, सरपंच सौ रंजना नहाते, दिपक अन्ना आंनदवार, देवेंद्र राऊत, दशरथ काळे, दशरथ पाटील, इदरचंद बैद, चंद्रशेखर देशमुख बबनराव चौधरी, गोपाल भोयर, विठ्ठल खोंडे, गजानन कोल्हे, गजानन पारखी, जयश्री तामगाडगे, यशोदा खेवले, सूमनबाई काळे, पार्वताबाई आत्राम, कीसन ऊईके,राहूल जीवने दिनकर झोटींग, आशिष झोटींग, गजानन ठाकरे,गणेश मुटे, सारंग दरणे, मुकेश धाडवे, अभिजीत लाखे,कीसनराव पावडे, यांचेसह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.