
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा मोहीम १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबवली जात आहे त्या अनुषंगाने सावंगी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने व ग्रामपंचतीच्या पुढाकाराने दिं ८ ऑगष्ट २०२२ सोमवारला हर घर तिरंगा उपक्रमाला उत्साह पूर्ण लोक सहभाग मिळावा म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन ढोल ताशाच्या गजरात गावातून सायकल रॅली व प्रभातफेरी काढण्यात आली त्यानंतर घरोघरी तिरंगा उत्सव प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचा असून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीतील प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असे यावेळी सांगण्यात आले शेवटी रॅलीची सांगता जिल्हा परिषद शाळा येथे करण्यात आली आहे त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू व चित्रे यांचे प्रदर्शनी आयोजित केली होती .या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी केलेल्या कौशल्याने व कल्पकतेने वस्तू बाबत गटविकास अधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्यानंतर गटशिक्षण अधिकारी यांनी हर घर तिरंग्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले असून गावकऱ्यांनी प्रत्येक घरी तिरंगा लावून आपले कर्तव्य पार पाडावे असे यावेळी सांगण्यात आले असून गटविकास अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे.यावेळी उपस्थित गटविकास अधिकारी केशव पवार, निवासी नायब तहसीलदार दिलीप बदकी,
गटशिक्षणाधिकारी शेख लूकमान शिक्षण विस्तार अधिकारी सरलाताई देवतळे, ग्राम पंचायत सरपंच, सदस्य,ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका तसेच शाळेतील कर्मचारी होते
