
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील आठमुर्डी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने ११ जून रोजी ३ च्या दरम्यान अनेक लोकांच्या घरातील छप्पर गेले उडून यात प्रकाश मडावी,कुसुम जुमणाके व शांताबाई तोडासे,राजु मेश्राम व गावातील अनेक लोकांच्या घरावरील छप्पर उडून गेले तर इलेक्ट्रिक लाईनचे पोल,गुरांचे गोठे, मोठ मोठे झाडे या वादळी वाऱ्याने पडली आहे. परंतु इश्वर कृपेने जीवित हानी टळली आहे. सदर इतके मोठे वादळ गावकऱ्यांनी या आदी कधीच बघितले नव्हते.सदर अनाथ असलेल्या शांताबाईच्या घरावरील छप्पर उडाल्याने त्यांच्या डोक्यावर मोठे आभाळ कोसळले आहे.सदर प्रशासनाने आठमुरडी या गावात येवून पंचनामे करून गोरगरीब नागरिकांचे नुकसान पंचनामा करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील नागरिक करत आहे.
