राळेगाव काँग्रेस तर्फे रोड शो व प्रत्येक नगर पंचायत च्या वार्डातील मतदारांचा भेटीला उत्कृष्ठ प्रतिसाद

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव येथे 21 तारखेला होऊ घातलेल्या नगर पंचायत च्या निवडणुकीत काल दिनांक 17/12/2021 रोजी काँग्रेस पक्षाचे माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके सर व सहकार नेते ऍड. प्रफुलभाऊ मानकर, अकरा वाजता पासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक वार्डात रोडशो व मतदारांच्या भेटी घेऊन व काँग्रेस पक्षासाठी मतदारांकडून उत्कृष्ठ प्रतिसाद मिळत आहे आजच्या घडीला काँग्रेसमय राळेगाव शहरात वातावरण दिसत आहे. मतदार काँग्रेस पक्षाकडून जास्त प्रमाणात दिसत असल्यामुळे काँग्रेसच्या सर्व जागा विजयी होण्याच्या मार्गावर दिसत आहे. यावेळेस भाऊ आणि सर एकत्र असल्यामुळे सध्या कॉंग्रेसचा बोलबाला दिसत आहे. नंदू सबका बंधू ने यांनीसुद्धा वार्ड क्रमांक पाच मध्ये आपला करीष्मा दाखवून आघाडी वर दिसत आहे. तसेच सगळ्याच वार्डात काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर दिसत आहे.