
राळेगाव तालुका प्रतिनिधी: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या टि १ अवनी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन क्लब राळेगावच्या सदस्यांनी काल १३ मे रोजी डोंगरखर्डानजीकच्या शेतातील घरात दडून बसलेल्या एका दुर्मिळ सापाला पकडून त्याला जंगलात सोडून जिवदान दिले.
राळेगाव तालुक्यात प्राणी मित्र टि १ अवनी वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन क्लब राळेगाव या नावाने संस्था काही काळापासून कार्यरत आहेत. ग्रुप मधील जेष्ठ सर्पमित्र विजय सूर्यवंशी उपाध्यक्ष आशिष येरकाडे व सचिव नयन कोकाटे नेहमी प्रमाणेच त्यांना असाच एक फोन वसंता मोरे कैलास पौड डोंगरखर्डा यांच्या शेत शेजारी असलेल्या घरात साप दिसल्याची त्यांनी माहिती दिली. लगेच ग्रुपच्या उपाध्यक्षांनी त्या कॉल ची दखल घेत डोंगरखर्डा येथील टि १ अवनी वाइल्डलाईफ प्रोटेक्शन क्लब राळेगाव मध्ये काम करत असलेले सदस्य प्रेम आडे , प्रकाश भेदूरकर , अवि मेश्राम यांना त्या कॉल ची माहिती दिली असता क्षणाचाही विलंब न करता डोंगरखर्डा येथील टि १ अवनी वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन क्लब राळेगाव टीममधील सदस्य यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता . तिथे त्यांना जाडरेती या दुर्मिळ जातीचा साप शेत शेजारील घरात दिसून आला . त्याला अतिशय चपळाईने आपल्या ताब्यात घेतले व तेथील उपस्थित व्यक्तींना त्या सापाची माहिती दिली व सापाला जंगलात सोडून देण्यात आले.
