
काल शिवछत्रपतींच्या जयंती निमित्याने वरोरा शहरात १० शाखांचे उद्घाटन जल्लोषात करण्यात आले व एक प्रकारे विरोधकांच्या मनात धडकी व पक्षांतर्गत विरोधकांना चांगलाच चाप बसला. आता पुन्हा वरोरा शहारात १४ शाखांचे उद्घाटन लवकरच मराठी नववर्षाच्या निमित्याने होणार आहे ज्यामुळे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांची सत्ता वरोरा नगरपरिषद मधे स्थापित करण्याचा मार्ग सुकर होईल. या शाखा बांधणी करिता सहकार्य करणाऱ्या तमाम सहकारी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार आणि मनसे धन्यवाद !
