धुवाधार पावसाने मोडले कंबरडे राळेगाव तालुक्यात दमदार पावसाने नदी नाले शेत तुडुंब भरून राळेगाव तालुक्यात अनेक गावात पाणी शिरले

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

महसूल व कृषी विभागाणे पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित द्यावी शेतकऱ्यांची मागणी
राळेगाव तालुक्यातील अनेक गावांत पाणी शिरुन घरातील अनाज, घरातील वस्तू चे प्रचंड नुकसान गेल्या 24 तासापासून सुरू असलेल्या संताधार पावसाने राळेगाव तालुक्यातील धानोरा परिसरात असलेल्या नदी नाल्यांना तुडुंब पूर आलेला आहे त्यामुळे शेकडो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली आहे त्यामध्ये कापूस सोयाबीन तूर या मुख्य पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे व गावांमध्ये पाणी शिरुन घरातील अनाज, वस्तू,खते प्रचंड नुकसान झाले आहे.

मागील 2 वर्ष केलीबोंड अळी
न केली शेतकऱ्यांची दिवाळी
आता महापूरान गेली शेती
शेतकऱ्यांच्या जिव्हारी


नुकसानग्रस्त शेताचे महसूल आणि कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे राळेगाव तालुक्यातील परिसरात सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर पावसाचा जोर असल्यामुळे अगोदरच म्हणजे 09/07/2022 ला झालेल्या पावसाने शेत जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जिरले होते गेल्या 24 तासापासून आलेल्या पावसाने तर धुमाकूळ घातला असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे आणि नदी नाल्यांची पाणी शेतात जाऊन पिकाचे व घरातील वस्तूचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे नदी नाल्यांच्या पाण्याने पीक अक्षरता खरडून गेली असल्याचे चित्र उभे आहे या आसमानी संकटात संध्या शेतकरी सापडला आहे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासन मदतीचा हात पुढे करेल काय पंचनामा केव्हा होणार आणि मदत कधीपर्यंत पोहोचणार असा अर्थ टाळू शेतकऱ्यांनी काढला आहे महागड्या बी बियाण्याची लागवड करून कसाबसा शेतकऱ्यांनी आपली शेत पेरले होते परंतु या आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी पुरता भरडला गेला आहे पुन्हा कर्जाचा डोंगर वाढणार आहे आणि शेतकरी पुन्हा देशोधडीला लागणार आहे शासन मदत कुठपर्यंत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.