अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्ती च्या जोरावर बरीच कामे विनायास मार्गी लागतात?

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खरोखर चं जर एखादा विषय मार्गी लावायचा असं जर मनात आणल्यास चांगली लोकोपयोगी कामं आणि अवैध व्यवसायांवर लगाम लावता येतोय.
चिखली येथील स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता च नव्हता, नागरिकांना अंतिम संस्कारांच्यावेळी जायच म्हणजे महादिव्य काम.या संदर्भात प्रसिद्धी माध्यमाच्या प्रतिनिधींनी वृत्त प्रकाशित करताच दुसऱ्या च दिवशी तहसिलदार डाँक्टर रविंद्र कानडजे यांनी सर्व यंत्रणा सोबत घेऊन पाहणी केली आणि त्वरित गावकऱ्यांची न्यायिक मागणी पूर्ण करत रस्त्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सोबत अशी बरीचशी कामं तहसिलदारांनी झटपट मार्गी लावली आहे.
वडकी पोलिस स्टेशन अंतर्गत अवैध रेती तस्करी,अवैध दारु विक्री,गोवंश तस्करी ला बराच मोठा आळा वेळोवेळी धाडसत्र यशस्वी रित्या राबवून अवैध व्यवसायांवर संक्रांत आणून वचक निर्माण करण्यात ठाणेदार विनायक जाधव व त्यांचे सहकारी नागरिकांच्या मनात घर करत आहे.
या बाबत कारवाई संदर्भात पोलिस स्टेशन राळेगांव ची भूमिका सदोदित संशयास्पद दिसत आहे.धूम स्टाईल बाईक रायडर्स वर काहीच कारवाई नाही,अवैध रेती तस्करांना आर्थिक लाभासाठी पाठराखण करणं,शहरात व पोलिस स्टेशन अंतर्गत गावात सुरु असलेली अवैध देशी दारू विक्री,गोवंश तस्करी कडे कानाडोळा केला जातोय,ओव्हरलोड रेती टीप्पर चे तीन मोठे अपघात या दोन दिवसांत दुर्लक्षित धोरणामुळे झाले सुदैवाने जीवहानी नाही. कारभार सुस्तचं,आला दिवस ढकलण्यात अधिकारी व कर्मचारी धन्यता मानत आहेत, आणि सर्व अवैध व्यवसाय बिनधास्त पणे सुरु चं आहे हे विशेष..
आणि त्याच सोबत भूमि अभिलेख कार्यालय राळेगांव च्या दुर्लक्षित धोरणामुळे राळेगांव शहरातील घरकुलं लाभार्थ्यांचे मोजणी न केल्यामुळे दोन कोटी रुपये परत शासन दरबारी परत गेले आहे .
म्हणून चं अधिकाऱ्यांनी खरोखर चं जर एखादा विषय मार्गी नियमात बसवून मार्गी लावायचा म्हटल्यावर इच्छाशक्ती च्या जोरा वर लाऊ शकतात.