1

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
दिनांक 27 /04 /2022 रोजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव हे पोलीस अमलदार यांच्यासह वडकी परिसरात रात्री दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना धानोरा येथे पोहोचले व गोपनीय बातमीदार यांच्या माहितीच्या आधारे वडकी येथे राहणारा अवैध धंदे करीत असलेला उमेश कुनघाडकर हा त्यांच्या पांढऱ्या रंगाचे स्कार्पिओ वाहनांमध्ये राळेगाव येथून अवैध देशी दारू चा साठा घेऊन विक्री करण्याकरिता वाहतूक करून धानोरा येथे घेऊन येत आहे अशी ठाणेदार विनायक जाधव यांना माहिती मिळाली होती, त्यानुसार त्यांनी सापळा रचून पांढरा रंगाच्या चारचाकी वाहनाला थांबलेले असता,पोलिसांनी हात दाखवून तसेच बॅटरीचा उजेड देऊन रात्री अकरा वाजताच्या सुमारास थांबण्याचा इशारा केला असता सदर वाहनचालकाने पोलिसांची तपासणी चालू आहे हे पाहताच पोलिसांच्या इशारा चे उल्लंघन करून त्यांचे चार चाकी वाहन नथांबवता वाहन मागे घेऊन आला व विरुद्ध दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग करून त्यात धानोरा येथील ज्ञानेश्वर महाविद्यालय येथे थांबले व वाहनाची पाहणी केली असता सदरचे वाहन माहितीप्रमाणे पांढऱ्या रंगाचे स्कार्पिओ असल्याचे तसेच वाहनाचा क्रमांक एम एच 29 झेड 5050 असा असल्याचे दिसून आले सदर वाहनत वाहन चालक बसलेला असल्याने त्यास वाहनाच्या खाली उतरून पोलिसांनी थांबण्याचा इशारा देऊन तू वाहन का थांबविले नाही व नथांबविता पळून जाण्याचे कारण विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे त्यावर अधिक संशय आला असल्याने त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव उमेश मारोतराव कुनघाडकर वय 38 वर्षे राहणार वडकी असे सांगितले त्याचे वाहनाची झडती घेतली असता वाहनांमध्ये मागील शीट वर देशी दारू गोवा नंबर ०१ कंपनी चे 10 बॉक्स किंमत 28 हजार 800 रुपयांचे मिळून आले त्यात सदर दारूसाठा कुठून आणला कुठे घेऊन जात आहे तसेच विचारणा केली असता त्यांनी त्यांच्याकडे कोणतेही परवाना नसल्याचे सांगून सदरचा दारू राळेगाव येथून देशी दारू भट्टी मधून आणून धानोरा तसे दापोरी येथे घेऊन जात असल्याचे कबूल केले, सदरचा दारूसाठा हा विनापरवाना अवैधरित्या विक्री करण्याकरिता घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे नमूद इसमाकडून खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे देशी दारू गोवा नंबर 01 कंपनी चे 10 बॉक्स यामध्ये प्रत्येकी एका पेटीत 48 याप्रमाणे 480 ते किंमत 28 हजार 800 रुपये, वीस हजार पाचशे ऐंशी रुपये दारू विक्री करून आलेले नगदी व रियल मी कंपनीचा मोबाइल किंमत वीस हजार रुपये व महिंद्रा स्कार्पियो क्रमांक एम एच 29 झेड 50 50 किंमत आठ लाख रुपये असा एकूण आठ लाख 69 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला आहे सदर कारवाईदरम्यान आरोपी उमेश मारोतराव कुंघाळकर वय 38 वर्षे राहणार वडकी यास कायदेशीर रित्या ताब्यात घेण्यात आले असून त्यास सदरच्या दारूच्या मोठ्या प्रमाणात अवैध साठा उपलब्ध करून देणारे राळेगाव येथील अनुज्ञप्ती मालक तसेच सदर अनुज्ञप्ती मधील नोकर यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वडकी येथे कलम 65 (अ)( ई ),82, 83 महा .239/ 177 मोटर वाहन कायदा अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे, सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोकराव भेंडाले,पोलीस स्टेशन वडकी हे करीत असून वडकी परिसरात सुरू असलेला अवैधधंद्याचा कारभार हा नेमका कुठून चालतो कोणाच्या आशीर्वादाने याकडे गांभीर्याने विनायक जाधव व भेंडाळे साहेब लक्ष देत आहे वरील कारवाईमध्ये जमदार भोयर, शिपाई विकास धडसे दीपक वॉटर सवार, आकाश कुदुसे v विजय बसवेशंकर यांनी खूप मोलाचे सहकार्य करून आरोपींना ताब्यात घेतले आता खर तर वडकी पोलिसांनी मागील काही दिवसापासून खर पाहता अवैध्य धंद्यांना आळा घालण्याचे खुप मोठे काम करीत असल्याने परिसरात वडकी पोलीस स्टेशनची स्तुती करण्यात येत आहे.
