स्टेट बँक राळेगाव येथे ग्राहकांची गैरसोय

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)

राळेगाव येथील स्टेट बँक नागरिकांची डोके दुखी ठरत आहे राष्ट्रीयकृत बॅंक असल्याने या बॅंकेचे खातेधारक जास्त आहे . पण गेल्या दोन चार दिवसांपासून नागरिक या बॅंकेला चकरा मारुन ठकले आहे.ग्रामीण भागातुन लोक या बॅंकेत व्यवहार करन्यासाठी येतात पण येथील मुजोर कर्मचारी हे लंच टाईम होन्याआधी आपला टेबल सोडून गायब होतात .टेबलवर कर्मचारी येताच तुम्ही आता कशे आले तुम्हाला दोन वाजता बोलावले होते न मग का नाही आले चला उद्या या या भाषाचा वापर करून त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो बॅकेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही इतर सोयी सुविधा उपलब्ध नाही यामुळे नागरिकांची गैरसोय होतांना दिसतात जिल्हा धिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.