राळेगाव तालुक्यातील चिखली येथे युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील चिखली (बुद्ध विहार) येथे युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा, सिद्धार्थ मंडळ, रमाबाई महिला मंडळाच्या वतीने युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून सकाळी १०:०० वाजता बुद्ध विहारात बौद्ध उपासक उपसिकानी बुद्ध वंदना घेतली त्यानंतर गावातून ढोल ताशांच्या गजरात थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली . दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध होते यंदा मात्र निर्बंध हटवल्याने जयंतीचा उत्साह द्विगुणित झाला होता त्यामुळे आपल्या उद्धारकर्त्या बापाला मानवंदना देण्यासाठी सकाळपासूनच चिखली गावातील बौद्ध उपासक उपासिका बुद्ध विहारात उपस्थित होते सकाळी १०:०० वाजता पासून चिखली येथे भव्य मिरवणूक काढून जोर से बोलो,जय भिम बोलो एकच साहेब बाबासाहेब यासारख्या जय घोषानानी आसमंत दुमदुमून गेला व बौद्ध बांधवांनी आपला आनंद मोठा द्विगुणित केला .
भीम जयंती म्हणजे बौद्ध अनुयायांसाठी आयुष्य घडविणारा सोहळाच
हा उत्साह साजरा करण्यासाठी प्रत्येक अनुयायी आसुसलेला असतो मात्र मागील दोन वर्ष कोरोना संसर्गामुळे भीम जयंती साधेपणाने साजरी करावी लागली होती यंदा मात्र निर्बंध हटविल्याने एप्रिल महिना उजाडल्यापासून अनुयायाने जयंतीची जय्यत तयारी सुरू केली होती आणि १४ एप्रिल हा भीमजयंतीचा सोहळा मोठा थाटात साजरा करण्यात आला. यावेळी चिखली येतील भारतीय बौद्ध महासभा तसेच सिद्धार्थ मंडळ, रमाबाई महिला मंडळाच्या उपासक उपसिका तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते.