
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
घरकुल योजना प्रपत्र – ड यामधून एकूण 129 पैकी 67 लाभार्थ्यांना अपात्र कोणत्या निकषाच्या अधीन राहून ठरविण्यात आले. सदर लाभार्थी हे अतिशय गरजू व गरीब असून राहायला धड घरही नाही तरीही बहुसंख्य लाभार्थ्यांना अपात्र ठरवले. सदर बाबत पुनःश्च शहानिशा करून लाभार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यात यावा.व पात्र यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे या संदर्भात मा.तहसीलदार साहेब राळेगाव, प्रशांतभाऊ तायडे मा.सभापती पं. स.राळेगाव. मा.गटविकास अधिकारी पं. स.राळेगाव यांना ग्रा. पं. वनोजा मार्फत निवेदन देण्यात आले.सदर वेळी ग्रा. वि.सोसायटी चे संचालक श्री. प्रफुलभाऊ तायवाडे. खरेदी विक्री संघ राळेगाव चे संचालक श्री. अशोकभाऊ काचोळे.ग्रा.पं. सरपंच सौ.चंदाताई म.पोटरकर. उपसरपंच श्री. प्रभाकरभाऊ दांडेकर. ग्रा.पं. सदस्य श्री. संजयभाऊ आत्राम.ग्रा.पं. सदस्य सौ मालुताई दि.कोटनाके. ग्रा.पं. सदस्य श्री. चंदुभाऊ उगेमुगे व वनोजा गावातील घरकुल योजनेतील लाभार्थी.
लाभार्थ्यांना योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सदर वेळी देण्यात आला.
