दोन्ही गटाच्या मध्यस्थीने रिधोरा सोसायटी अविरोध

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

  .

राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था रजिस्टर नंबर ८६५ या संस्थेची निवडणूक अविरोध झाली असल्याने नागरिकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर वृत्त असे महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके, राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा यवतमाळ जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्लभाऊ मानकर, अरविंदभाऊ वाढोणकर, राळेगाव प.स.माजी सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रविणभाऊ कोकाटे, अंकुशभाऊ मुनेश्वर यांनी दोन्ही गटात समन्वय साधून रिधोरा सोसायटी अविरोध व्हावे म्हणून प्रयत्न केला होता. वरील सर्व मान्यवरांच्या शब्दाचा मान ठेवून राळेगाव प.स.माजी सभापती प्रविणभाऊ कोकाटे हे रिधोरा गावचे रहिवासी असल्याने त्यांनी स्वता पुढाकार घेऊन व रिधोरा गावचे सरपंच उमेश गौऊळकार यांनी दोन्ही गटात समन्वय साधून ही सोसायटी अविरोध केली आहे. तसेच ही निवडणूक अविरोध होण्यासाठी हरिषजी काळे,दिपकराव पवार, गनेश गौऊळकार, मयुर पंडीले, यांनी सुद्धा पुढाकार घेऊन ही सोसायटी अविरोध केली आहे. यात कर्जदार गटातून प्रविण भानुदास कोकाटे,बाबाराव पांडुरंगजी गौऊळकार, हरिष मारोतराव काळे,लोभा रामदासजी चौधरी, कमलाबाई अंबादास उईके,चंदन राजेंद्र कांडुरवार,खुशाल महादेव वाढंई, विष्णु विठ्ठल महाजन तर महिला राखीव गटातून सौ. प्राजक्ता प्रविण कोकाटे, श्रीमती विमल दादाजी सातघरे तर ओबीसी गटातून दिपक पंढरीनाथ पवार तर अनुसूचित जाती जमाती गटातून सचिन अनिल मुनेश्वर तर भटक्या जमाती गटातून शरद लक्ष्मण सातघरे हे अविरोध निवडून आले आहे. ही निवडणूक अविरोध झाल्याने रिधोरा येथील प्रतिष्ठित नागरिक दामोधरजी गौऊळकार मारोतराव काळे,विजय कांडुरवार, लीलाराम लेनगुरे, अनंतराव वाढंई,सुरेभानजी गुरनुले, सीताराम आडे, पंढरीनाथ करपते, वसंतराव वाढगुरे, दिलिप गुरनुले,भानुदास आडे, क्रीष्णा महाजन, भास्कर तोडासे, दिगांबर खंडाळकर, हीरामन झुंगरे, दिनेश गुरनुले, संतोष निंबुळकर,गनेश निंबुळकर तर राळेगाव तालुका रुग्ण मित्र संजय गुरनुले, अरविंद वाघमारे,धनराज येरणे, साईनाथ निकुडे,हनुमान गाऊत्रे,अनिल चौधरी, होमदेव गुरनुले, यांनी आभार मानले