राळेगाव शहरात सहा प्रभागात नंदकुमार गांधी यांच्या वैयक्तिक निधीतून हॅंडपंपचे उद्घाटन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

दिनांक 10/6/2022 रोज शुक्रवारला शुभ दिवसाचे औचित्य साधून राळेगाव शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती तथा प्रगतिशील व्यापारी तथा स्वीकृत नगरसेवक श्री नंदकुमार गांधी यांनी त्यांचे वडील स्व.हिरालालजी गांधी व त्यांच्या मातोश्री स्व.शांताबाई नंदकुमार गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राळेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 2,प्रभाग क्रमांक 4,प्रभाग क्रमांक 5,प्रभाग क्रमांक 10,प्रभाग क्रमांक 11,प्रभाग क्रमांक 13 अशा सहा प्रभागात कांग्रेस कमेटीचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष श्री प्रफुल्लभाऊ मानकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले ,भुमीपूजन करण्यात आले.व ताबडतोब बोअरवेल सुध्दा सुरू करण्यात आले.त्यावेळी कांग्रेस ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष श्री अरविंद वाढोणकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री मिलिंद इंगोले,श्री नंदकुमार गांधी,श्री दिपक देशमुख,श्री राजेंद्र तेलंगे, नगराध्यक्ष रविंद्र शेराम, उपनगराध्यक्ष जानरावजी गिरी, नगरसेवक मंगेश राऊत, गजानन पाल, प्रतिक बोबडे,श्रावनसिंग वडते,तातेश्वर पिसे,पिंपरे सर,अनिल डंभारे,राहूल होले, अंकित कटारिया, गोवर्धन वाघमारे, अंकुशराव रोहणकर, बादशाह काझी, राजू दुधपोहळे,गोंविदा धोटे, विनोद जयपूरकर, विनोद नरड,बंडू लोहकरे, प्रदीप ठुणे,ईब्बूसेठ बब्बर, बि. यू.राऊत, हमीद पठाण, सनी छोरीया ,कुंदन कांबळे सह नगरपंचायतचे पदाधिकारी, नगरसेवक, ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगावचे पदाधिकारी, संचालक,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक मंडळ, वसंत जिनिंगचे पदाधिकारी, संचालक, खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी, संचालक मंडळीसह अनेक मान्यवर तथा सहाही प्रभागातील नागरिक, महीला भगिनी उपस्थित होते.नंदकुमार गांधी यांच्या अतिशय महत्वाच्या स्तुत्य उपक्रमाची शहरासह तालुक्यात होत असून सहाही प्रभागातील मतदार बंधू भगिनींनी नंदकुमार गांधी यांचे अभिनंदन केले आहे.