विज बिल भरण्यासाठी सवलत द्या व पुर्व सूचना न देता विज पुरवठा तोडू नका :उपविभागीय अधिकारी राळेगाव आणि कार्यकारी अभियंता राळेगाव याना निवेदन

प्रतिनिधी:रामभाऊ भोयर,राळेगाव

मागील वर्षीच्या लॉकडाऊन काळातील अवाजवी आलेली वीज बिले आपण आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत सक्तीने वसुली केल्या जात आहेत.यंदाही कोरोना संकटाने उद्योग धंदे,व्यवसाय,रोजगार बंद असल्याने दोन वेळच्या जेवणाचे सुद्धा नागरिकांचे वांदे झाले असतांना आपल्या विभागामार्फत तालुक्यात होणारी सक्तीची विज बिल वसुली यामुळे नागरिकांसमोर मोठा पेच निर्माण झाला असुन आपण ही विज बिले भरण्याकरिता नागरिकांना काही दिवसांची सवलत द्यावी व वीज पुरवठा कोणतीही पुर्व सुचना न देता तोडू नये ही आपणास विनंती
अन्यथा जनहितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट मनविसे तालुकाध्यक्ष शैलेश आडे वडकी विभाग अध्यक्ष संदीप गुरुनुले भोजराज चौधरी प्रसाद परचाके पवन पचारे ऋतिक जांभूर्कर रवी मडावी पवन दडांजे कीरण कुमरे आकाश नेहारे योगेश कूमरे तुषार शेंडे विशाल भगत मंगेश गुरणुले अभिषेक सोयाम नागेश ढेकणे रहीम शेख वाशीत शेख विठ्ठल शेंडे सचिन शेंडे