श्री लखाजी महाराज विद्यालयात प्रायोगिक तत्वावर आँनलाईन पध्दतीने कार्यक्रमाचे आयोजन.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती व मॉं जिजाऊ जयंतीचे आँनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड सर अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेश भोयर सर उपस्थित होते.सर्व प्रथम दोन्ही मान्यवर महोदयांनी दोन्ही महान विभूतीच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.त्यानंतर मान्यवर महोदयाचे स्वागत समारंभ कार्यक्रम पार पडला.नंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ कुंदा काळे यांनी करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी वक्ते कु निकिता राजुरकर,कु.प्रतिक्षा देशमुख, कु. काजल करलुके, कु. आरती चांदेकर,कु हर्षाली देशमुख, कु. सोनिया चव्हान यांची भाषणे झाली.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेश भोयर सर यांनी स्वामी विवेकानंद व मॉं जिजाऊ यांच्या बध्दल सखोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षिय भाषणापूर्वी विद्यालयात घेण्यात येणाऱ्या आँनलाईन स्पर्धा परिक्षेबद्धल सखोल माहीती विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका कु वैशाली सातारकर यांनी आँनलाईन मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड सर यांनी अध्यक्षिय मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचलन रंजय चौधरी सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षक रमेश टेंभेंकर सर यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे शिक्षक श्रावनसिंग वडते सर, दिगांबर बातुलवार सर,सौ. वंदना वाढोणकर मँम,सौ.स्वाती नैताम मँम, मोहन आत्राम सर, मोहन बोरकर सर, अमित बातुलवार सर, तिजारे मँम, कोल्हे मँम, व शिक्षकेत्तर कर्मचारी वाल्मिक कोल्हे,पवन गिरी, शुभम मेश्राम,बाबुलाल येसंबरे, विनोद शेलवटे उपस्थित होते.हा कार्यक्रम आँनलाईन पध्दतीने घेण्यात आला.या आँनलाईन कार्यक्रमात जवळ पास पन्नास विद्यार्थी ज्वाईन झाले होते.हा कार्यक्रम आँनलाईन पध्दतीने पुढील तासिका आँनलाईन पध्दतीने घेण्याच्या दृष्टीने प्रायोगिक तत्वावर घेण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामिण भागाच्या दृष्टीने चांगला प्रतिसाद मिळत असल्याने शिक्षक बंधू भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.