राष्ट्रीय लोक अदालत मधून पाच कौटुंबिक वाद मिटले

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राज्य विधी सेवा प्राधिकरण वकील संघ राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालत मधून विविध 97 प्रकरणाचा निपटारा झाला यामध्ये छोट्या छोट्या कारणाने पती-पत्नी पासून विभक्त झालेल्या पाच कुटुंबाच्या संसाराचा गाडा पूर्व सुरू झाला त्यामुळे राष्ट्रीय लोक अदालत मधून पाच सुखी कुटुंब कुटुंब पुन्हा गुण्यागोविंदाने नांदण्यास राजी झाले राष्ट्रीय लोक अदालत चे उद्घाटन न्यायाधीश विजय जटाळ न्यायाधीश भूषण नेरलीकर यांच्या हस्ते झाले यावेळी वकील संघाचे ॲड प्रफुल्ल चौहान ठाणेदार संजय चोबे पॅनल सदस्य ऍड मधुसूदन अलोने ऍड अफसर काझी ऍड अनिरुद्ध भोयार प्रा अशोक पिंपरे शाखा व्यवस्थापक पंकज पांगारकर बँक उपव्यवस्थापक गणेश धां दे यांची उपस्थिती होती लोक अदालत मधून कौटुंबिक वाद . वाद पूर्व खटले. ग्रामपंचायतीचे प्रकरणी बँकांची थकीत प्रकरणे व इतर प्रकरणी ठेवण्यात आली होती यातून 97 प्रकरणाचा निपटारा झाला राष्ट्रीय लोक अदालत मधून आपसी समजते आतून दोन्ही पक्षकारांच्या सामंजस्याने वाद मिटला असतो त्यामुळे अधिकाधिक लाभ अशा उपक्रमाचा लाभ घ्यावा असे न्यायाधीश व पॅनल प्रमुख विजय जटाळ यांनी सांगितले राष्ट्रीय लोकदलाचे यशस्वी करिता न्यायालयाचे अधीक्षक राजेश भास्कर वार सतीश देशपांडे अजय चांदुरकर विशाल डा फ. शशिकांत ढाले प्रियंका तिडके .तुषार बागडे. अमोल अडसकर. अरुण पारधी कुंदन दास मेश्राम.किरण थोटे. देवानंद मेश्राम जनार्दन खडतदे परविन सय्यद. यांनी परिश्रम घेतले. कौटुंबिक वाद मिटलेल्या जोडप्यांना पुष्पगुच्छ देऊन भावी सुखी आयुष्याच्या शुभेच्छा न्यायाधीशांनी यावेळी दिल्या.