सरला देवतळे यांची शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती राळेगाव येथे पदोन्नती

. राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील मूळच्या रहिवाशी आणि संताजी शिक्षक प्रसारक मंडळ यवतमाळ चे माजी संचालक स्व. बाबाराव देवतळे यांच्या पत्नी श्रीमती सरला देवतळे या सद्या जि प उच्च प्राथमिक केंद्र शाळा जळका येथे उच्च श्रेणी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत.विविध शैक्षणिक उपक्रमात सहभागी होऊन त्यांनी शाळेला नावलौकिक मिळयुन दिला आहे.दि 23 जून ला जि प यवतमाळ द्वारे त्यांची शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती करून त्यांना राळेगाव पंचायत समिती मध्ये पदस्थपना देण्यात आलेली आहे.

त्यांच्या या झालेल्या पदोन्नती बद्दल शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षक यांच्यात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.त्याच प्रमाणे धानोरा येथील रहिवासी असल्याने राळेगाव तालुक्यात व धानोरा परीसरात आनंदचे वातावरण निर्माण झाले आहे.