
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
शेती हंगाम तोंडावर आहे. हवामान खात्याने यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज वर्तविला. या पार्श्वभूमीवर बी -बियाणे, खते व शेतीउपयोगी वस्तू खरेदी करतांना शेतकर्यांची फसवणूक होऊ नये या कडे कृषी विभागाने जातीने लक्ष दयावे अशी मागणी राळेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
येत्या काळात शेती हंगाम सुरु होत असुन शेतकऱ्यांची लगभग बि बियाने खत तथा शेती उपयोगी वस्तूंची खरेदी जोरात सुरु होईल .याचा गैरफायदा घेण्याची दाट शंक्यता आहे. याबाबत बि बियाणे यांच्या सोबत ईतर काही वस्तूची घेण्याची सक्ती करु नये तथा भाव फलक लावून दररोज चे भाव तथा किती साठा उपलब्ध आहे .याची माहीती देने .व प्रत्येक कृषि केंद्राचे परवाने तपासने अशी मागणी करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत शेतकर्यांची नाडवणूक होता कामा नये. राळेगाव हा आदिवासी बहुल शेतकरी, कष्ट्करी सामान्य जनतेचा तालुका आहे. इथली अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. शेतकरी हा घटक महत्वाचा आहे. त्याची फसवणूक खपवून घेणार नाही. अशी भावना शिवसैनिकांनी या वेळी वेक्त केली
न्याय मागणीचे निवेदन देतांना शिवसेना उप शहर प्रमुख संदिप पेंदोर, युवा सेना शहर प्रमुख योगेश मंलोडे, ईमरान पठान, रोशन ईरपाते, नाना किनाके, दिनेश किन्हेकर यांचे सह शिव सैनिक हजर होते. राळेगाव तालुक्यात शेतकरी हिताचा निर्णय शिवसेनेद्वारे घेण्यात आल्याची प्रतिक्रिया वेक्त होतं आहे.
