
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
देवधरी येथे पन्नास कोटी रुपयांचा जैविक इंधन,सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प राळेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारा ठरेल,नवी दिशा देणारा ठरेल असा आत्मविश्वास माजी मंत्री व आमदार प्रा. वसंतरावजी पुरके सर यांनी आयोजित शेतकरी मार्गदर्शन शिबिरात व्यक्त केला आहे.
एमसीएल व राळेगांव ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड ॲन्ड विठोबा माऊली ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी च्या वतीने बाॅयोगॅस सेंद्रिय खत व जैविक इंधन निर्मिती प्रकल्पा करिता सभासद नोंदणी प्रक्रिया साठी कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगांव च्या आवारात या संदर्भात सविस्तर माहिती द्यावी या साठी शेतकरी शिबिर आयोजित केलं होतं. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी शेतकरी बांधवांनी सभासद व्हा वे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगांव सभापती ॲड प्रफुल्लभाऊ मानकर यांनी करुन,नवीन काहीतरी करुन आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी आता हे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. या वेळी अशोकराव केवटे,अरविंदभाऊ वाढोणकर,पंचायत समितीचे सभापती प्रशांतभाऊ तायडे यांनी मार्गदर्शन केले. प्रकल्पाचे सविस्तर पुढील नियोजन,त्याचे शेतकऱ्यांना भविष्यात होणारे लाभ या विषयी कंपनी चे संचालक मिलिंदभाऊ दादाराव फूटाणे पुणे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचलन माजी सभापती प्रविणभाऊ कोकाटे यांनी तर आभार प्रदर्शन संचालक अंकुशराव मुनेश्वर यांनी केले. या वेळी परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
