सरकार च्या विरोधात लोकप्रतिनिधी नी  रस्त्यावर बसून चक्काजाम करणं म्हणजे नौटंकी करणे होय- मधुसूदन कोवे गुरुजी


राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामु भोयर (9529256225)


—————————————————————- 
कोरोणा महामारीचं संकट अजुन ही आटोक्यात आलं नाही आणि लोकप्रतिनिधी नी रस्त्यावर बसून चक्काजाम करणं आणि लोकाची गर्दी गोळा करणं हे संयुक्तिक आहे का? आपण आपल्या हक्कासाठी नक्कीच आंदोलन निवेदन दिले पाहिजे पण गर्दी गोळा करायची आणि फोटोसेशन करणे म्हणजे निव्वळ नौटंकी कार्यक्रम आहे असा उपरोधिक टोला कालच्या रास्ता रोको आंदोलन वर मधूसुदन कोवे गुरुजी यांनी लगावला आहे. 

लोक प्रतिनिधी नी रस्त्यावर बसून चक्काजाम करण्यापेक्षा सभागृहात बसुन सरकार समोर आपल्या समस्या मांडल्या पाहिजेत सरकार ला धारेवर धरले पाहिजे चर्चा घडवून आणली पाहिजे पण तसं कधी होताना दिसत नाही सत्ताधारी लोकप्रतिनिधी ना आपलं मतं व्यक्त करण्यासाठी सभागृह उपलब्ध आहे रस्त्यावर बसून चक्काजाम करण्याची आवश्यकता नाही असे रस्त्यावर चे कार्यक्रम करणं “गारोड्याचा खेळ” उभा करण होय.

सहा महिण्या पासून शेतकरी आंदोलन करत आहे कोरोणा काळात सामान्य कुटुंबातील लोक उपासमारीचा सामना करत आहे लोकांना कामधंदा नाही सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार नाही करोडोचा विषेश निधी उपलब्ध असुन दोन वर्षांपासून धुळ खात पडून आहे फक्त जाहिरात बाजी चालू आहे अशा अनेक विषयांवर लोक प्रतिनिधी बोलत नाही आहे म्हणून लोकप्रतिनिधी नी रस्त्यावर बसून चक्काजाम करण्यापेक्षा सामान्य लोकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी आवाज उठविला पाहिजे असे मत.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी सोशल मीडिया वर व्यक्त केले आहे