
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
आयुष्यभराची पुंजी काही क्षणातच गेली तर किती दु:खं होईल हे कुणालाही शब्दात मांडता येणार नाही. राळेगाव येथील शांतीनगर मध्ये घडलेल्या एका दुर्घटनेमुळे शांताबाई गोविंद नाणे वाट्याला हे दु:खं आलं आहे. घरात शॉकसर्किटमुळे आग लागली आणि काही क्षणातच सर्वकाही राख झालं. शांतीनगर येथे ही दुर्दैवी घटना घडली. या लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. आगीच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. मात्र तोवर शांताबाई गोविंद नान्हे यांची सगळी स्वप्न आगीत राख झाली होती. सुदैवाने या जीवित हानी झाली नाही.
या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष डॉक्टर कुणालभाऊ भोयर यांनी घटनास्थळी जाऊन आगीत होरपळून शांताबाई गोविंद नान्हे यांना धीर देत . त्यांचे सांत्वन केले.
