
तालुका प्रतिनिधी: रामभाऊ भोयर,राळेगाव
प्रभाग क्रमांक १५ मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे सुशोभीकरण व परिसरातील विकासाकरिता निधी मिळावा याबाबत आदर्श मंडळाच्या अपक्ष नगरसेविका सौ. पुष्पाताई विजय किन्नाके यांच्या वतीने बाभुळगाव येथील एका कार्यक्रमात देण्यात आले.
यावेळी खा. भावना ताई गवळी यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
निवेदन देतांना आदर्श मंडळाचे फिरोज भाऊ लाखाणी, विजयराव किन्नाके सह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
