

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येथील पर्यावरण बचाव समिती च्या माध्यमातून तारीख 17/04/2022 ला उन्हाळ्यामध्ये तहानलेल्या पक्षांना पाणी मिळावे व त्यांचा जीव जाऊ नये याकरता प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरी अंगणात बाल्कनीत छतावर मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून त्यांची तहान भागवावी याकरता वरील पर्यावरण बचाव समिती कडून मातीच्या भांड्यांची विक्री करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. ना नफा ना तोटा या संकल्पनेतून वरील मातीच्या भांड्याचे वितरण करण्यात आले. राळेगावकर जनतेनी त्याला उस्फुर्त प्रतिसाद दिला. वरील मातीचे भांडे विक्रीच्या कार्यक्रमात रालेगाव तालुका संघ चालक भूपेंद्र कारिया, राळेगाव नगर पंचायत चे स्वच्छता दूत युसुफ अली सैय्यद, रामचंद्र देवस्थानचे अध्यक्ष अनिल जी वर्मा, विवेकानंद विचार मंच चे मेघशामचांदे सर्वांचे मामा, गुरुदेव सेवा मंडळाचे मेश्राम गुरुजी भगवंतराव धनरे, प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष गजाननराव डाखोरे ,संघाचे तालुका सहकार्यवाह प्रशांत मेंडोले, गायत्री परिवाराचे रामकृष्ण कारमोरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक योगेश पारिसे इत्यादी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला ध्वनिक्षेपकावरून वरील विषयाची जनजागृती व्हावी याकरता युसुफ अली सय्यद व कार्यकर्त्यांनी आवाहन केले व या कामात राळेगावकर नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला ध्वनिक्षेपकाची व्यवस्था पतंजली परिवाराचे प्रदीप भाऊ देशमुख यांनी करून दिली आणि भांडे वाहून नेण्याकरता गाडीची व्यवस्था जगन नगराळे यांनी करून दिली. सरतेशेवटी आयोजकांनी जनतेचे व सर्व दात्याचे आभार मानून चहापान चहापानानंतर कार्यक्रम संपन्न झाला.
