
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी ग्राम स्तरावर प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी ग्राम स्वराज्य महामंच चे अध्यक्ष मा.मधुसुदनजी कोवे गुरुजी आणि राष्ट्रीय कीसान महासंघाचे अध्यक्ष मा युसूफ भाई आज वणीनगर आणि बरडगावं येथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेताना शेतकरी अतिवृष्टीमुळे हवालदिल झाला आहे असे दिसून येतं होते
संपुर्ण राळेगाव तालुक्यात शेकडो एकर शेती अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे कपासीचे बोंड सडुन गेले आहे सोयाबीन तूरीचे पिकं पिवळे पडुन करपुन गेली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना हेक्टरी २५०००रुपये मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने दिली पाहिजे
शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तलाठी ग्रामसेवक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून शेतीच्या पीकाच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सर्वेक्षण अहवाल तयार करून शासनाला सादर केला पाहिजे.
