दिवाळीच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

ऐन दिवाळीच्या तोंडावर जिवनावश्यक वस्तुंचे दर गगणाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी खाद्यतेलासह सर्वच आवश्यक वस्तुंची साठेबाजी केली. असल्याने खुल्या बाजारात त्यांची टंचाई भासत आहे. त्यामुळे आता जनतेला महागड्या दराने खरेदी करावी लागणार आहे. जिवनावश्यक वस्तुंचा अवैध साठा करून असे निर्देश केंद्र सरकारने दिले असुनही व्यापारी वर्ग या निर्देशाला न जुमानता आवश्यक साठेबाजी करीत आहे.