सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्या:राळेगाव तालुका पत्रकार संघाची उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तेव्हा सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत प्रस्तावित करावी अशी मागणी राळेगाव तालुका पत्रकारसंघाने प्रशासनाकडे केली आहे नुकतेच या आशयाचे निवेदन पत्रकारसंघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना देण्यात आले निवेदनात तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे सोबतच शेताचे बांध, धुरे,फुटले ,शेतात पाणी साचले यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे अश्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत घ्यावी सोबतच शहराला लागून असलेल्या नाल्याचे सरळीकरण व खोलीकरण करावे जेणेकरून नाल्याकाठच्या शेतामध्ये पाणी साचणार नाही ,गावतुन वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे ही शेतांत पाणी साचतात त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी ,अतिवृष्टीमुळे तालुक्यातअनेक घरांचे नुकसान झाले त्यांना तात्काळ आर्थिक मदत घ्यावी,रस्त्याची चुकीची कामे झाल्याने अनेक घरात पाणी शिरते याबाबत कार्यवाही करावी आदी मागण्याचे निवेदन राळेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले निवेदन देताना
राळेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश काळे, उपाध्यक्ष विशाल मासुरकर, दीपक पवार, सचिव फिरोज लाखाणी, महेश शेंडे, राष्ट्रपाल भोंगाडे, सचिन राडे, धिरज खेडेकर, रामू भोयर, राजू काळे, प्रविण गायकवाड, रणजीत परचाके, शालीक पाल, विनोद माहुरे, मनोहर बोभाटे सह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.