जिल्ह्यातुन लसीकरणात प्रथम क्रमांक आल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ. बरघट साहेब यांचा सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ. बरघट साहेब यांनी कोरोना काळात ऊत्कृष्ट असे काम केले व यवतमाळ जिल्ह्यातुन लसीकरणात प्रथम क्रमांक आल्याबद्दल जि.प अध्यक्षा कालिंदाताई पवार यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉ. बरघट साहेब यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. अशोकराव उईके, जि.प. मुख्य अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ साहेब, जि.प. सदस्य चिंतरंजनदादा कोल्हे, जि.प.सदस्या सौ प्रितीताई काकडे, प.स.सभापती प्रशांतभाऊ तायडे, जि प सदस्य उषाताई भोयर, प.स.गटविकास अधिकारी रविकांत पवार साहेब, टि. एच. ओ पाटील साहेब,संजयभाऊ काकडे, लाडताई, व इतर मान्यवर व नागरीक उपस्थित होते.