
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आदिवासी समाजातील लोककला, सामुहीक लग्न ,परंपरागत सण,उत्सव आणि त्यांच्यातील उपजत कलागुणांना व सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देण्याच्या द्रुष्टीने आर्णी – केळापूरचे मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा. डॉ.संदीपभाऊ धुर्वे यांच्या अथक परिश्रमाने आदिवासी बहूल पांढरकवडा शहरात १ एकर जागेवर १ कोटी रुपयाचे भव्य आदिवासी सांस्कृतिक भवन भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिवीर शहीद वीर बाबुराव शेडमाके,महाराणी विरांगणा दुर्गावती, शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर होते. उद्घाटक आमदार डॉ संदीप धुर्वे, प्रमुख अतिथी नगराध्यक्ष वैशाली नहाते, पंचायत समिती सभापती राजेश पसलावार, नगरपरिषद उपाध्यक्ष सरफराज, ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड. प्रमोद घोडाम, आदिवासी एम्प्लाँईज फेडरेशनचे केंद्रीय कार्याध्यक्ष सुरेश कनाके, ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्याध्यक्ष मीनाक्षीताई वेट्टी,ट्रायबल वुमेन्स फोरम राज्य उपाध्यक्ष रचना मेश्राम, डॉ. अंगाईतकर, डॉ. निलेश परचाके, प्रा.डॉ. हरीष धुर्वे, उपस्थित होते.
याप्रसंगी ट्रायबल फोरम,आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन यांचे वतीने आमदार डॉ. संदीपभाऊ धुर्वे यांचा शाल,श्रीफळ ,मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी समाजाच्या व्यथा मांडून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला डॉ संजय तोडासे, मंगला सिडाम, बंडू सोयाम,संभा मडावी,पवन कुडमथे,बंटी जुवारे ,आनंद वैद्य,ऋत्विक पाटिल, अतुल बेले,शंकर पंधरे,दिलीप मडावी,वासुदेव वट्टी,संतोष किनाके,ओंकार मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
