पक्षांसमोर बंडखोरांचे आव्हान, ?बंडखोरां समोर तीन चार पर्याय असल्याने पक्षश्रेष्ठी चिंतेत?

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


नगर पंचायत राळेगांव ची निवडमूक या वेळी अतिशय रंगतदार होणारं असल्याचे चित्र अवघ्या चार चं दिवसांत स्पष्ट झाले आहे.
हमखास विजयाची “हमी” सध्या हालचाली वरुन काँग्रेस पक्षाची,भाऊ आणि सर हे हातात ‘हात’ घालून लढविणार असल्याने सतरा प्रभागा साठी शंभरावर कार्यकर्ता मंडळी मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहे.हीच मोठी अडचण म्हणा की डोकेदुखी पक्ष नेतृत्वाची आहे.कारण काँग्रेस कडून उमेदवारी नाकारल्यास बंडखोरां जवळ सक्षम पर्याय म्हणजे भाजपा चा आहे आणि विद्यमान भाजपा आमदार याचीच प्रतिक्षा करत आहे. तीन निवडणूकी चा हा ताजा इतिहास आहे.आयात केलेल्या ना उमेदवारी द्यायची आणि इमानेइतबारे पक्ष संघटन मजबूत करणारे खड्या सारखे बाहेरचं हे भाजपा मध्ये च दिसत आहे.
आजमितीला काँग्रेस पक्षा जवळ चौदा सक्षम उमेदवार तयार आहे.या व्यतिरिक्त इतर पक्षात तीन उमेदवार सोडल्यास,सक्षम,स्वच्छ,जनसामान्यां ना चालणारा उमेदवार नाही. सक्षम उमेदवार च राजकीय पक्षाला विजयश्री मिळवून देऊ शकतो.
आजी माजी आमदार यांनी उमेदवार चाचपणी सुरु केलेली आहे. मागील वेळी जे नाराजी,जीरवाजीरवी,असंतुष्टांचा भरमार काँग्रेस पक्षात बघावयास मिळाला,तीच परिस्थिती आज भाजपा मध्ये दिसत आहे.मनोमिलनाच्या चार बैठका होऊनही आजूबाजूच्या नी मतभेद कायम ठेवण्यात धन्यता मानली आहे..दिवसेंदिवस नगर पंचायत राळेगांव ची निवडणूकी च्या चर्चा रंगत असून,”नन्दू” सबका “बंधू” चांगल्या चांगल्या चे राजकीय भविष्य उध्वस्त करणार अशीच चर्चा सध्या जोरात सुरु आहे हे विशेष..
.