समाजभान जपणारा (डॉक्टर कुणाल) करतोय जनसेवा,स्व. डॉ. बाबारावजी भोयर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यात सहा सर्वदूर आपल्या निस्वार्थ रुग्ण सेवेने परिचित असलेले राळेगाव येथील डॉक्टर स्वर्गीय बाबारावजी भोयर यांच्या निधनानंतर त्यांचा वसा त्यांचे सुपुत्र डॉक्टर कुणालभाऊ भोयर यांनी उचलला अजून कोरणा सारख्याच जीवघेण्या महामारी च्या काळात जीवनाची पर्वा न करता दिवस-रात्र रुग्णांना त्यांच्याजवळ पैसे असो व नसो सेवा देण्यात ते सदैव तत्पर राहिले यासोबतच त्या काळात गोरगरिबांचे सर्व व्यवसाय मजुरी बंद असल्यामुळे त्यांच्या जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता त्या वेळी मदतीचा रूपात डॉक्टर कुणालभाऊ यांनी अनेक गरजूंना कोरोना काळात औषध उपचार सोबतच अन्नधान्य सुद्धा पुरवले आहे म्हणूनच त्यांच्या या निस्वार्थ सेवेबद्दल त्यांचा कोरोना योद्धा म्हणून स्व.धनजीभाई कारीया या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

आजही डॉक्टर कुणाल भाऊ भोयर यांनी समाजसेवेचे कार्य सुरू ठेवले आहे त्याचाच भाग म्हणून वडील स्व. डॉ. बाबारावजी भोयर यांचे स्मृती प्रित्यर्थ डॉक्टर कुणालभाऊ मित्र परिवार राळेगाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे जिल्हा वर्धा रुग्णालयांच्या खर्चात सवलत देणारे शिबिर दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी रविवारला महावीर स्कूल राळेगाव येथे आयोजित केली आहे

या शिबिराचे उद्घाटन राळेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रा.डॉ.अशोकरावजी उईके यांच्या हस्ते होणार असून या शिबिरात करिता प्रमुख पाहुणे म्हणून चित्तरंजनदादा कोल्हे तालुका अध्यक्ष भाजपा तथा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती प्रशांत भाऊ तायडे, श्रीमती उषाताई भोयर जिल्हा परिषद सदस्या, प्रीतीताई काकडे जिल्हा परिषद सदस्या, श्रीमती शीलाताई सलाम उपसभापती पंचायत समिती राळेगाव, सौ स्नेहाताई येनोरकर सदस्य पंचायत समिती, राळेगाव प्रदीप भाऊ कडू संस्थापक गाव सेवा एक सामाजिक संघटन अभ्युदय मेघे विशेष कार्य अधिकारी उपस्थित राहणार आहे

या शिबिरामध्ये रक्तदाब ब्लड शुगर, बरेच दिवसाचा ताप, किडनीचे आजार, हृदयरोग अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, डोक्याचे सर्व आजार, हायड्रोसिल, हर्निया, अंगावरील गाठी, मासिक पाळीचे आजार, लहान मुलांचे सर्व आजार, त्वचेचे विविध आजार, फॅक्चर, तसेच हाडाचे सर्व आजार, कान नाक घसा चे सर्व आजार, दमा, बरेच दिवसाचा खोकला, सह विविध आजाराची तपासणी या शिबिरामध्ये होणार असून आवश्यक रुग्णावर सवलतीच्या दरात हायड्रोसिल शस्त्रक्रीया 1999/- रुपये तसेच दोन्ही बाजूची 2499/- रुपये आणि हनिया शस्त्रक्रिया एका बाजूची 4999/- रुपये दोन्ही बाजूची 6,499/- रूपयांपासूनचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया 999/- यामध्ये होणार आहे

या शिबिरात आजचा शहरातील तसेच तालुक्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान डॉक्टर कुणाल भाऊ भोयर यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहेत