विषारी औषध प्राशन करून एका विवाहित इसमाची आत्महत्या,दहेगाव शेतशिवारातील घटना

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दहेगाव येथे एका 27 वर्षीय विवाहित युवकाने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दि 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9,30 च्या सुमारास उघडकीस आली आहे,
मिळालेल्या माहितीनुसार यातील दीपक वामन मेश्राम वय वर्ष 27 रा दहेगाव असे विषारी औषध प्राशण केलेल्या युवकाचे नाव असून याने दहेगाव शेतशिवारातील मंगी दिगडोह तलावाजवळ विषारी औषध ,ही घटना वडकी पोलिसांना माहिती होताच घटनास्थळी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव सह जमादार अरुण भोयर,पोलीस नाईक विलास जाधव,सह विक्की धावर्तीवर,अविनाश चीकराम यांनी भेट देऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुढील राळेगाव येथे पाठविण्यात आला असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पर्यंत कळू शकले नाही मृतक दीपक च्या मागे पत्नी,आई वडील भाऊ असा आप्त परिवार असून या घटनेने दहेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे,या घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन ठाणेदार विनायकराव जाधव करीत आहे.