क्रिस्टल कंपनीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ,जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रायव्हेट लिमिटेड मुंबई कंपनी ही यवतमाळ जिल्ह्यात काम करत असून गेल्या नऊ ते दहा महिन्यापासून येथे सुरक्षारक्षक कामगार यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळला नाही म्हणून आज रोजी त्यांनी जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना निवेदन दिले, सर्व सुरक्षा रक्षक कामगार हे गेल्या सहा ते सात वर्षांपासून मासिक वेतनाच्या तत्त्वावर काम करीत आहे परंतु त्यांना जानेवारी 2021ते सप्टेंबर 2021असे पूर्ण नऊ महिने होऊन सुद्धा त्यांना मासिक वेतन देण्यात आलेल नाही,वारंवार याची विचारणा जिल्हा व्यवस्थापक यांना करून विनंती केली असल्यास उद्धटपणे उत्तर देऊन पगाराच्या संदर्भात कोणीही काहीही बोलू नये असे वारंवार सांगण्यात येते जर पगाराच्या संदर्भात बोलण्यात आले तर कामावरून कमी करण्यात येईल अशी धमकी सुद्धा देण्यात येते,यासंदर्भात आज रोजी क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन कामगाराच्या पगाराची विल्हेवाट लावण्यात यावा अन्यथा आम्ही सर्व काम करत असलेले कर्मचारी आमच्या घरची परिस्थिती हालाखीची असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आले आहे तरी या संदर्भात काही निर्णय शाशन घेणार का व येत असलेला सण दिवाळी परिवरा सोबत साजरी होईल का असा प्रश्न समोर असल्याने सुरक्षारक्षक कामगार यांच्यावर परिवाराची जबाबदारी असल्याने, उपासमारीची वेळ आली आहे, अशा स्वरूपाचे निवेदन आज रोजी जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले आहे.