
किन्ही : ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला संलग्न कृषी महाविद्यालय कोंघारा येथील सातव्या सत्रातील अभिषेक भांदक्कर, कुणाल आगलावे, रोहन बनपल्लीवार, हर्षल बड़कल आणि कार्तिक या कृषिदूतांनी किन्ही येथे जाऊन शेतकऱ्यांना कलम निर्मितीचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच त्यांना कलम निर्मितीचे फायदे पटवून दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत वानखेडे, रावे इन्चार्ज प्रा. संकेत येलोरे व फलोत्पादन विभागाचे प्रमुख प्राध्यापक वैभव काले यांचे मार्गदर्शन लाभले.
