कोरोना लसीकरणात यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव तालुका अव्वल प्रथम डोस ७२टक्के तर, दुसरा डोस ३१ टक्के

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

लसीकरणात राळेगाव तालुका जिल्ह्यासोळाही तालुक्यात अव्वल राहिला आहे. तालुक्यात १८ वर्षांवरील ८८ हजार ४०५ पैकी ६३ हजार १७५ नागरिकांनी (७२ टक्के) पहिला तर, २७ हजार ४९२ नागरिकांनी (३१ टक्के) लसीचा दुसरा घेतला आहे. लोकसंख्येने मोठ्या असलेल्या किन्ही जवादे गावात जवळपास सर्व नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.

याशिवाय इतर जवळपास दहा लहान गावातही संपूर्ण लसीकरण करण्याची कामगिरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बजावली आहे. उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे, गटविकास अधिकारी रमाकांत पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोपाळ पाटील व त्यांची महसूल, पंचायत, आरोग्य विभाग व दोन्ही लाटेत कोरोना नियंत्रणात यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव तालुका सर्वोच्चस्थानी राहिला होता. त्यानंतर आता लसीकरणातही अग्रस्थान कायम राखण्यात यश मिळविले आहे. ग्रामीण रुग्णालयाची यंत्रणा आदींच्या सहकार्यामुळे यशाचा हा टप्पा गाठण्यात यश मिळाले आहे.

आरोग्य विभागाने वरचेवर कॅम्प लावल्याने आणि इतर विभागांनी जनजागृती केल्याने मोहिमेस वेग मिळविता आला. ग्रामस्तरीय कर्मचारी व पदाधिकारी यांनी पुढील काळात थोडे आणखी परिश्रम घेतल्यास संपूर्ण तालुक्यात पूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट गाठले जाण्याची आशा आहे.