विद्युत मोटार जळाल्याने आठ दिवसा पासून पाणी पुरवठा बंद,कायम स्वरुपी सी.ई.ओ. नाही



राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

नगर पंचायत राळेगांव च्या पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारी जळाल्याने शहरात आठ दिवस पिण्याचे पाणी नागरिकांना मिळाले नाही.
तीन आठवड्याआधी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी स्थानापन्न झाले. सर्व विषय समितीचे सभापती व स्वीकृत नगरसेवक निवडल्या गेले.
आणि बरोबर दहाव्या दिवशी च पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचे दुर्लक्षित धोरणामुळे सुरु असलेली शेवटची विद्युत मोटार जळाल्याने,पाणी मिळणं दुरापास्त झाले आहे.
चार विद्युत मोटारी आहे,दोन आधीच बेवारस अवस्थेत कामाच्या असताना ही टाकण्यात आल्या.तर एक विद्यूत मोटार वर्षंभरा पासून दुरुस्ती साठी टाकण्यात आली पण अजून दुरुस्त झालीच नाही. हा सर्व गंभीर प्रकार मागील सत्तारुढाच्या व प्रशासकीय कार्यकाळातील आहे.
नगर पंचायत राळेगांव ला कायमस्वरुपी सी.ओ. नसल्याने सर्व त्र गोंधळ च गोंधळ होतोय. कारण घाटंजी च्या सी.ओ कडे प्रभार आहे. आणि मंगळवार दिवस असून ही आपले मुखदर्शन होत नाही. सर्व बाबी आर्थिक व्यवहारा शी निगडीत असल्याने सी.ओ.च्या शिवाय कोणतं च काम करणं शक्य च नाही. या दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत होईल असे नगर पंचायत च्या वतीने सांगण्यात आले आहे…
नगर पंचायत राळेगांव मध्ये काँग्रेस पक्ष,तीन अपक्ष व दोन शिवसेना सदस्य यांचे वर्चस्व आहे.काँग्रेस चे माजी शिक्षण मंत्री प्रा.वसंतरावजी पुरके व पालकमंत्री ना.संदीपानभाऊ भूमरे यांनी कायमस्वरुपी सी.ओ.नगर पंचायत राळेगांव ला त्वरित द्या वा अशी सत्तारुढ नगरसेवक व नगरसेविका यांची रास्त मागणी केलेली आहे.