वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजन सम्मेलनातुन गुरुकुंज नगरी श्रीरामपूर येथे नवचैतन्य निर्माण झाले – मधुसूदन कोवे

गुरुकुंज नगरी श्रीरामपूर येथे नव वर्षाच्या प्रारंभी नवं चैतन्य निर्माण व्हावं हा उदात्त हेतू घेऊन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी निमित्त तीन दिवशीय भजन स्पर्धेचे आयोजन केले होते.

उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित उद्घाटक मा.प्रा.वसंतराव पुरके माजी शिक्षणमंत्री उपस्थित होते
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच प्रमुख अतिथी अरविंद वाढोणकर मा निश्चिल बोभाटे माजी सरपंच श्रीरामपूर मा.बाबारावजी अलबनकर श्री कीसनाजी झाडे बालयोगी अनंत महाराज राकेश राऊळकर श्री विजय जी दुर्गे उपस्थित होतेतिन दिवसिय भजन सम्मेलनात महिला पुरुष सविस गुरुदेव सेवा मंडळानी सहभागी होवून गुरुकुंज नगरी श्रीरामपूर येथे नवचैतन्य निर्माण झाल्याचे वातावरण दिसून येते होते असे मतं मधुसूदन कोवे गुरुजी यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले आहे नवं वर्षाच्या प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त नवराष्टचे तालुका प्रतिनिधी विनोद अलबनकर युवा पत्रकार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला होता

भजन सम्मेलन कार्यक्रम आयोजनात गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवदास मंगाम नारायण येंचलवार,शरद साखरकर गजानन झाडे विक्रम अलबनकर विनोद चांदेकर अभय अलबनकर विशाल राऊत मंगेश ठाकरे नितीन एकुणकर भोजराज मंगाम दुर्गेश झाडें सागर मंगाम यांनी मोलाचे सहकार्य केले आहेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश राऊत यांनी केले तर तिन दिवसिय सहभागी गावातील लोकांचे आभार आयोजन मंडळाचे अध्यक्ष शिवदास मंगाम यांनी मानले