
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)
तालुक्यातील श्रीक्षेत्र यजागजई येथील देवालये यंदा कोरोनाच्या महामारीमुळे देव दर्शनासाठी बंद असल्याने तसेच नदी पात्रात पवित्र स्नान करण्यास पुर्णतः बंदी घालण्यात आल्याने यंदाचा उत्सव रद्द करण्यात आला आहे.तेव्हा आदीवासी समाज बांधवांनी वैशाख स्नान करिता येथे येवू नये असे आवाहन संस्थान कमेटीचे अध्यक्ष प्रशांत वारेकर यांनी केले आहे.
दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे आदिवासी समाजाचे भाविक भक्त वैशाख पोर्णिमेला श्रीराम मंदिर श्रीविठ्ठल मंदिर श्रीनिर्गणशी महाराज संस्थान श्रीक्षेत्र जागजई येथील देवालयात देवदर्शना करीता व वर्धा नदीच्या पात्रात पंचधारा येथे पवित्र स्नानाकरिता येत असतात पण यावर्षी कोरोना संक्रमणाचा काळ सुरू असल्याने जमावबंदी व लाँकडाऊन सुरु आहे.श्रीक्षेञ जागजई देवालय दर्शनासाठी शासनाच्या पुढील आदेशा पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.व नदी पाञात स्नान करण्यास मनाई करण्यात आली आहे.तेव्हा सर्व भाविक भक्तांनी येथे न येता सर्व धार्मिक विधी आप आपल्या गावात राहून घरीच साजरा करावा.असे जाहीर आवाहन संस्थान कमेटीचे अध्यक्ष प्रशांत वारेकर तसेच उपविभागीय महसूल अधिकारी शैलेश काळे राळेगावचे ठाणेदारांनी भाविक भक्तांना केले आहे.
