
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
कीन्ही जवादे येथे एस एस क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कबड्डी सामन्यांचे बक्षीस वितरण सरपंच सुधीरभाऊ जवादे, उपसरपंच रमेश तलांडे, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद नीकुरे, मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण भोयर,सचीव पवण खैरकार, क्रीडा प्रमुख आदित्य सुधीरभाऊ जवादे ,नरेश ठाकरे यांचे उपस्थितीत संपन्न झाले, उपांत्य सामन्यांचे वेळी माजी शिक्षणमंत्री प्रा वसंतरावजी पुरके सर उपस्थित होऊन कबड्डी सामन्यांचे आयोजक, खेळाडू, प्रेक्षक यांचा उत्साह वाढवला.अंतिम सामना करंजी रोड व देवधरी या दोन संघात झाला.करंजी रोड संघाने आपल्या अष्टुपैलु खेळाणे प्रथम पारितोषिक व सरपंच चषक पटकावला . यावेळी जनार्दन ढेकणे,मनोहर मामा ठाकरे,अशोकअडपवार, होरे सर, आत्माराम गानफाडे, , बंटी भाऊ मोहर्ले, संदीप परसोडकर,अनिकेत बोटरे,रूपेश ठाकरे,निलेश माणगी, संगीत धाबेकर, देवा ठाकरे यांनी सामन्यांचे यशस्वी होण्यासाठी परीश्रम घेतले.
