
पत्रकार संरक्षण मंडळ का नाही ?
सहसंपादक : रामभाऊ भोयर
तुमसर येथील साप्ताहिक जनता की आवाज कार्यालय येथे 194 व्या मराठी पत्रकार दिन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार यांच्या हस्ते माल्यार्पण करून मराठी पत्रकार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जनता की आवाज चे मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार म्हणाले की ,या राज्यात कामगारांची नोंद होऊ शकते !मग ऊन, वारा, पाऊस, मध्ये रात्रंदिवस राबणाऱ्या ग्रामीण पत्रकारांची नोंद का होत नाही!लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचे प्रश्न तात्काळ सोडविल्या जात नाही ?अधीस्वीकृती करिता अनेक पत्रकारांचे प्रश्न मागील ५ वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहेत .परंतु त्यांचे प्रश्न सुद्धा निकाली निघालेले नाहीत .त्याचप्रमाणे शासन स्तरावर पत्रकार संरक्षण मंडळ सुद्धा स्थापन झालेले नाही .फक्त पत्रकारांनी लिखाणच करत राहावे आणि घरी उपाशी राहावे ही कुठली लोकशाही? पत्रकारांचे प्रश्न तात्काळ सोडून त्यांना अशासकीय समित्यांचे प्रतिनिधी, अधिस्वीकृती दर्जा, विमा संरक्षण, संरक्षण कायदा, घरकुल योजना, पत्रकारांकरता महामंडळ अशा अनेक योजना लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना लागू करण्यात याव्यात अशी मागणी सुद्धा आपल्या निवेदनातून जनता की आवाज साप्ताहिकाचे मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभक्त यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना एका लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे.
