
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याला तब्बल एक कोटी सदतीस लाख 64 हजाराने गंडा घातला ही गंभीर घटना राळेगाव येथे तीन जानेवारी रोजी उघडकीस झाली या प्रकरणी राळेगाव पोलिसांनी एका महिलेसह अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मात्र या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे मनीष कांतीलाल बोथरा व ४८ राहणार माळीपुरा राळेगाव असे फिर्यादीचे नाव आहे ते राळेगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी आहेत घटनेनंतर त्यांनी राळेगाव पोलीस यांना रीतसर तक्रार दिली त्यावरून चार नोव्हेंबर 2025 रोजी बोथरा यांच्या व्हाट्सअप वर अंकिता अग्रवाल नामक एका महिलेचा कॉल आला तिने क्रिप्टो करेंसी आणि फोरेक्स ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष बोथरा यांना दाखवले त्यानंतर आरोपीने फिर्यादीला व्हाट्सअप वर एक लिंक पाठवून येस फॉक्स नावाचे आपलिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले विश्वास संपादन झाल्यानंतर सुरुवातीला व्यापाऱ्याला ट्रेडिंग करण्यासाठी विविध बँक खात्यात काही पैसे भरण्यास सांगितले या ॲपमध्ये व्यापाऱ्यांनी गुंतवणूक आणि त्यावर मिळणारा नफा हा बनावट पद्धतीने फुगवून दाखवला जात होता यामध्ये दिसणारा नफा पाहून व्यापाऱ्याने स्वतःच्या व्यवसायातील पैसे आणि काही बँकांकडून कर्ज काढून एक कोटी ३७ लाख ६४००० रुपये गुंतवले त्यानंतर व्यापाऱ्याने नफ्याचे आपले मूळ रक्कम ऑनलाईन काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तांत्रिक कारणे सांगून पैसे देण्यास नकार देण्यात आला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बोथरा यांनी राळेगाव पोलिसात तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी आरोपी अंकिता अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा अधिक तपास अप्पर पोलीस अधीक्षक रॉबिन बंसल करत आहेत
