
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हुमनी अळीच्या आक्रमणाने हवालदिल झाला आहे .कपाशी ,सोयाबीन व तुर या मुख्य पिकांवर या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असतांना कृषी विभागाचे मात्र या कडे लक्ष नाही .प्राथमिक अवस्थेत याचा बंदोबस्त न झाल्यास चाळीस टक्के नुकसान होण्याची भीती जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहे. हुमनी अळी शक्ती मधील सर्वात खतरनाक आणि नुकसान करणारी कीड असून या किडीचे नियंत्रण करण्यासाठी खूप गोष्टींचे नियोजन करणे गरजेचे असते. या किडीचा पिकांमध्ये प्रादुर्भाव झाला तर कमीत कमी पिकांचे 50 ते 60 टक्क्यांच्या पुढे नुकसान होते. तसे पाहायला गेले तर ही कीड विविध प्रकारच्या पिकांमध्ये असते परंतु ऊस शेतीमध्ये देखील हुमणीचा उपद्रव खूप मोठ्या प्रमाणात यावर हो तुझा मात्र यावर्षी प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यात तूर कापूस सोयाबीन यासारख्या पिकावर सुद्धा या हुमानी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे. यामुळे बरेच शेतकरी या किडीमुळे त्रस्त आहेत. तसे पाहायला गेले तर या किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक उपाय योजना ऐवजी एकात्मिक कीड नियंत्रण खूपच गरजेचे असते. मात्र अशा प्रकारेचे नियंत्रण कुठेही आढळून येत नाही. कारण याबद्दल कृषी विभाग कुठलेही प्रकारची जनजागृती किंवा शेती शाळा आयोजित करत नाही. आणि कृषी अधिकाऱ्यांना हुमाणी अळीच्या नियोजन याबद्दल सुद्धा माहिती आहे की नाही अशीही सुद्धा शंका वाटते. यामुळे संबंधित विभागाने व अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर नियोजन शेतकी शाळा आयोजित करून यावर उपाय योजना करणे आवश्यक आहे व शेतकऱ्यांमध्ये याबद्दल जाणीव जागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या नुकसानाची पंचनामे तत्काळ करून भरपाई सरकारने त्या शेतकऱ्याला लवकरात त्यांना देण्यात यावी.
युवा शेतकरी – स्वप्नील वटाणे
