
सहसंपादक :;रामभाऊ भोयर
माझ्या घरची परिस्थिती ही अतिशय बिकट होती माझे शिक्षण हे बहुतांश मी स्वतः नौकरी करूनच केले आहेत पण असे असतानाही मी यूपीएससी परीक्षा पास करून अधिकारी झालो आयुष्यात मोठे अधिकारी व्हायचं असेल तर यासाठी घरची परिस्थिती आडवी येत नाही तुमच्यात जिद्द चिकाटी आणि प्रचंड मेहनत करायची तयारी असेल तर निश्चितच तुम्ही मोठे अधिकारी होऊ शकता बहुतांश मुलं हे परिस्थितीवर मात करूनच अधिकारी होतात असे मत नागपूर येथील आयकर विभागाचे उपायुक्त अनिल खडसे यांनी व्यक्त केले न्यू इंग्लिश हायस्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून अनिल खडसे बोलत होते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाऊसाहेब धर्मे होते न्यू इंग्लिश हायस्कूल येथे चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन सुरू आहेत स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाला प्रमुख अतिथी म्हणून न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ अर्चना धर्मे यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे संचालक ऍड प्रफुल्ल चौहान मुख्य न्याय दंडाधिकारी डॉक्टर विकास कारमोरे सहाय्यक लेखाधिकारी स्वप्नील पापडकर राळेगाव नगरपंचायत चे उपाध्यक्ष जानराव गिरी न्यू एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उज्वल बेहेरे संचालक सचिन धर्मे स्वप्निल धर्मे आदी उपस्थित होते यावेळी स्वर्गीय केशवरावजी चिरडे स्मृती प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले तसेच शाळेची स्मरणिका बहरलेली अमृतवेल इचा प्रकाशन सोहळा सुद्धा सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला तसेच यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी बाळू धुमाळ विनय मुनोत प्रकाश खुडसंगे तसेच सर्व मान्यवर माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब धर्मे यांनी संस्थेच्या प्रगतीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे सांगितले तसेच अनेक अडचणीवर मात करीत संस्थेने इथपर्यंतचा प्रवास केला आहेत व भविष्यात संस्था उत्तरोत्तर प्रगती करेल असे सांगितले यावेळी शाळेतर्फे घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा तसेच डिश डेकोरेशन स्पर्धेचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक सहाय्यक शिक्षक तसेच सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सुद्धा संस्थेच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विजय कचरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश काळे यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजय चिरडे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उप मुख्याध्यापक सुरेश कोवे पर्यवेक्षक सूचित बेहेरे यासह सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले
