
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
दिनांक 29 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या धिक्कार मोर्चा ने राळेगाव शहरात घडविला इतिहास
सरकारी ,निमसरकारी, संघटित, असंघटित कर्मचारी, पेन्शनर्स, बेरोजगार तथा शेतकरी बांधव, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शापोआ मदतनीस यांनी आज राळेगावच्या गांधी लेआउट मधून क्रांती चौक, रावेरी पॉईंट , क्रांती चौक ,जुना आठवडी बाजार ते आंबेडकर चौक, बिरसा मुंडा चौक, ते पंचायत समिती समोरून गांधी लेआउट अश्या मार्गाने भव्य दिव्य विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 2005 नंतरच्या नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, अंगणवाडी सेविका आशा वर्कर शालेय पोषण आहार मदतनीस व उमेद कर्मचाऱ्यांना 26000 मानधन देण्यात यावे, तसेच कंत्राटीकरण कायदा रद्द करावा, रिक्त पदे त्वरित भरावी, अशा अशा विविध मागण्यांच्या संदर्भात सर्व संवर्गातील कर्मचारी एकजूट होऊन रस्त्यावर उतरले व त्यांना साथ लाभली सुशिक्षित बेरोजगार शेतकरी ग्राम स्तरावर मानधन तत्वावर काम करणाऱ्या सेविकांची या मोर्चाचे नेतृत्व निमंत्रक श्री मधुकरराव गेडाम सेवानिवृत्त तहसीलदार व मुख्य संयोजक महेश सोनेकर अध्यक्ष शिक्षक संघटना यांनी केले, पहिल्या टप्प्यातील आंदोलन दिनांक 24 सप्टेंबर ला यवतमाळ येथे करण्यात आले, आजचा हा दुसरा टप्पा यानंतर तिसऱ्या टप्प्याच्या संपासारख्या आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येणार आहे ,
जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा , हमारी युनियन हमरी ताकत, अशा घोषणांनी राळेगाव शहर दनानंद सोडले
त्यासोबतच सुखाने समितीतील संयोजक मंडळी गजानन बलांद्रे महसूल, रंजय चौधरी शंकर माहुरले मध्यामिक विभाग,गजानन भोयर ग्रामसेवक संघटना जगदीश ठाकरे , खेमचंद चिमणे शिक्षक संघटना,संजय राऊत आरोग्य संघटना,लताताई माटे अंगणवाडी संघटना, भाऊरावजी ठाकरे पेन्शनर संघटना गोपाल बुरले माध्यमिक संघटना,सागर इंझळकर राजेंद्र दुरबुडे, सचिन राऊत नगरपंचायत संघटना
तथा विविध संघटनेतील पदाधिकारी विशेष करून सुरेश कुंभलकर, सुभाष पारधी लताताई अवतारे ,कल्पना महाकुलकर ,छायाताई दांडेकर कुडुमते ताई प्राजेशा कीन्हेकर,
यांचे विशेष सहकार्य लाभले राळेगावच्या इतिहासात भव्य दिव्य विराट मोर्चाची नोंद झाली
विविध संघटनेच्या पदाधिकारी यांनी मोर्चाला संबोधित केले त्यात व तिसऱ्या टप्प्यातील मोर्चा करिता अधिक तकदीने उतरण्याचे आव्हान अधिकार मोर्चा कृती समिती च्या वतीने मोर्चाचे निमंत्रक श्री मधुकरराव गेडाम व मुख्य संयोजक महेश सोनेकर यांनी आव्हान केले
