जिल्हा परिषद शाळा बोर्डा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी,विद्यार्थ्यांचे महामानवाला अभिवादन

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी भारतातील महू येथील एका महार कुटुंबात झाला.भारताच्या नवनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय आहे. भारतीय संविधानाच्या निर्मितीमधून त्यांचे हे श्रेष्ठत्व प्रमाणित होते. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये प्रादेशिक, भाषिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारताला एकसंध ठेवण्याचे कार्य प्रामुख्याने होत आहे.या आशयाचे विचार जिल्हा परिषद शाळा बोर्डा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन लांडे मॅडम यांनी केले .जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्डा येथे 14 एप्रिल ला आंबेडकर जयंतीच्या निमिताने शाळेच्या मुख्याध्यापिका लांडे मॅडम ,सौ विजया शेंडे मॅडम, चंदा ताई देवगडे तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित भाषणे दिली. शेंडे मॅडम यानी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. व आभार प्रदर्शन शेंडे मॅडम यांनी केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.