
मागील अनेक वर्षांपासून येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू व मराठी शाळेत शिक्षकांचे मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे होती.ती आता भरण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा होणार शैक्षणिक नुकसान तूर्तास थांबणार असल्याने पालकवर्गात समाधान व्यक्त करण्यात येत असून येथील उर्दू शाळे मध्ये नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा पालकांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आले.
येथील तिन्ही जिल्हा परिषद च्या शाळा
मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी संख्या आहे. मात्र शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे होती.
ही रिक्त पदे भरण्यासाठी गावकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा देखील केले. तरी सुद्धा शिक्षक देण्यात आले नाही शेवटी 10 सप्टेंबर रोजी ना ईलाजने गावकऱ्यांनी थेट रस्त्यावर शाळा भरवून आंदोलन करून प्रशासनाचे आपल्या शिक्षकांच्या मागणी कडे लक्ष वेधले.त्या वेळी उपलब्ध असलेले शिक्षक शाळांना देण्यात आले मात्र तरी सुद्धा शिक्षकांची पदे रिक्तच होती.शिक्षका अभावी ग्रामीण विद्यार्थ्यांनाचा शैक्षणिक नुकसान होत होते.नुकतीच जिल्हा बदली होऊन शिक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत.यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान तूर्तास थांबणार असल्याने पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.हे शैक्षणिक सत्र सुरू होताच नवीन शिक्षक शाळेत रुजू झाले आहेत.आज जि.प.प्रा.उर्दू शाळेत या नवीन शिक्षकांचे पालकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तसलीम शेख यांनी स्वागत व सत्कार केले.या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिस भाई ,बाबू खान,आयाज नवाब,शेख नफिस अहेमद, मोहसीन खान,अब्दुल रहेमान खान,फर्मान नवाब , जम्मन शेख,अय्युब शेख, यांच्या सह पालक व सोहेल मिर्झा,मोहसीन पटेल,मो.साजिद,जावेद खान पठाण हे शिक्षक हजर होते.
