
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
नगर पंचायत राळेगांव ची निवडणूक २१ डिसेंबर रोजी होणार असून,दोन दिवसा पासून सर्व च राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सक्षम उमेदवार चाचपणी स सुरुवात केल्याने,राजकीय वातावरण तापावयास लागले आहे.
काँग्रेस आणि भाजपा कडे उमेदवारी मागण्यासाठी खूप इच्छुक आहे.हमखास यशाची शाश्वती असल्याने पक्षश्रेष्ठी सक्षम,सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा आणि पक्षाशी प्रामाणिक असणाऱ्या उमेदवाराला विशेषतः काँग्रेस पक्ष आणि भाजपा प्राधान्य देत आहे. कारण पक्षाचे चिन्हावर निवडून यायचे आणि समोर पक्ष नेतृत्वाला न जुमानता “गद्दारी” करणे याचा चांगला च अनूभव काँग्रेस व भाजपा ने मागील प्रथम पंचवार्षिक मध्ये घेतलेला आहे.
काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार घोषीत होण्याची प्रतिक्षा सर्वात जास्त भाजपा चे विद्यमान आमदार करत आहे.कारण यावेळी भाजपा मध्ये “कूरबूर”मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे चर्चेअंती निदर्शनास येत आहे.सोबत च राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,मनसे,आप हे देखील आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करणार आहे. आता पर्य॔त केलेली आंदोलने,धरणे,मोर्चे सह इतर कामांना मतदार किती प्राधान्य देतात तेही कळेल चं…
“नंदू सबका बंधू” चांगल्या चांगल्या चे राजकीय भविष्य उध्वस्त करणार अशीच चर्चा सध्या जोरात सुरु असून,”नंदू”च्या अनअपेक्षित “एन्ट्री”ने अनेकांच्या मनात किलबिल वाढलेली आहे हे विशेष….
