सी बी एस ई बोर्डाच्या दहावी परीक्षेचा (टर्म -२) सैनिक पब्लिक स्कूलचा निकाल जाहीर


राळेगाव प्रतिनिधी रामभाऊ भोयर

सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्यूकेशन ने (सी बी एस ई ) दहावीचा दुसरा टप्पा अर्थात द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. टर्म २ परीक्षा एप्रिल आणि मे २०२२ मध्ये घेण्यात आली होती. ही परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली. टर्म २ परीक्षेत राळेगाव तालुक्यातील वडकी येथील सैनिक पब्लिक स्कूलच्या विध्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
यात शाळेचा निकाल ९२.५६ टक्के लागला असून त्यामध्ये निधी दिपक महाजन हिने प्रथम – ८९%, व्दितीय आयुष शर्मा ८६.६%, तृतीय अनुष्का प्रविण लढे ८६% तर चतुर्थ अपेक्षा त्रिवेंद्र बरडे ८२.६ टक्के गुण मिळवून शाळेच्या यशात मनाचा तुरा लावला. 

शाळेचे अध्यक्ष रि. मेजर श्री. रणधिरसिंह दुहन सचिव श्री. सत्यवानसिंग दुहन, मुख्याध्यापक श्री. सचिन ठमके, परीक्षा व्यवस्थापन अधिकारी सौ. शितल कोकुलवार व सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाचे कौतुक व अभिनंदन केले.